spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

MUMBAI: कार्यालयाच्या वेळा बदला, CENTRAL RAILWAY ची मागणी

या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी वेळापत्रक बदलण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यावर तोडगा मिळाला तर तो तात्काळ राबविण्यात येईल, असे आश्वासन मध्ये रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी दिले आहे.

वाढणाऱ्या गर्दीचा त्रास कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने (CENTRAL RAILWAY) आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्यानंतर आता याला व्यापक स्वरूप यावे, यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील सरकारी निमशासकीय  कार्यालयासह ३५० संस्थांशी मध्य रेल्वेने मागील १६ दिवसात पत्र व्यवहार केला होता. यामध्ये कार्यालयाच्या वेळा बदलण्याबाबत विनंती करण्यात आली होती.

मध्य रेल्वे मार्गावरून दररोज ३५ ते ४० लाख प्रवासी प्रवास करतात. गर्दीच्या वेळी तीन ते चार मिनिटांनी लोकलची एक फेरी धावते. मात्र गर्दीमुळे लोकल सेवेवर ताण येतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन शिफ्ट्समध्ये विभागले आहे. आता या गोष्टीचे अनुकरण करण्याची विनंती इतर संस्था आणि ऑफिसला करण्यात आली आहे. त्यासाठी १  नोव्हेंबर पासून हॉस्पिटल, महापालिका, पोलिस प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रसिद्धी माध्यमे, खाजगी संस्था आणि बँकांना कार्यालयीन वेळांमध्ये बदलांची विनंती करण्यात आली आहे. या पत्र व्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास गर्दीचे योग्य व्यवस्थापन होईल, असा विश्वास मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 

रविवारी आणि एखादी कार्यालयीन-सार्वजनिक सुट्टी असल्यास मध्य रेल्वेवर सुट्टीच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येतात. त्यामुळे ३५० फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशी वेळापत्रक बदलण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यावर तोडगा मिळाला तर तो तात्काळ राबविण्यात येईल, असे आश्वासन मध्ये रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी दिले आहे.

हे ही वाचा : 

भुजबळांच्या टीकेला रोहित पवारांचं सडेतोड उत्तर

Uttarakhand Tunnel Crash, उत्तरकाशीतील बोगद्यात ६ दिवस अडकले मजूर, जाणून घ्या सविस्तर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss