Prakash Ambedkar यांनी केले खळबळजनक वक्तव्य ; ‘हे’ चार नेते रडारवर घेण्याचे केले आव्हान

Prakash Ambedkar यांनी केले खळबळजनक वक्तव्य ;  ‘हे’ चार नेते रडारवर घेण्याचे केले आव्हान

सध्या राज्यात राजकारण हे वेगवेगळ्या पातळ्या गाठत आहेत. मागच्याच काही दिवसांमध्ये अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यावर मनसे सैनिकांकडून हल्ला करण्यात आला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यांसंबंधी अनेक दिग्गज नेत्यांनी अनेक वक्तव्य केली. या सर्वात जास्त गाजले वक्तव्य म्हणजे प्रकाश आंबेडकर (Praksh Ambedkar) यांचे वक्तव्य. शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अजबच विधान केल्याचे पाहायला मिळाले.

नेमके काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या चिल्लर लहान लोकांची गाड्या का फोडता, गाड्याच फोडायच्या झाल्यास शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा, असं अजब विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. परभणीच्या गंगाखेड येथे वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सभेला संबोधित करत असताना हे वक्तव्य केले. प्रकाश आंबेडकर कालपासून परभणी जिल्ह्याच्या विविध भागात ओबीसी आरक्षण बचाव यात्रेनिमित्ताने सभा घेत आहेत. आज गंगाखेड येथे आंबेडकरांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत आंबेडकरांनी चक्क शरद पवार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, शरद पवार यांच्या गाड्या फोडा असं वक्तव्य केले. अमोल मिटकरी आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यासारख्या चिल्लर लहान लोकांची गाड्या का फोडता, गाड्याच फोडायच्या झाल्यास शरद पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या गाड्या फोडा, असं अजब विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

काय आहे मिटकरी प्रकरण?

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर पुण्यातील पूरपरिस्थितीवरून टीका केली होती. त्यानंतर त्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी अकोल्यात मिटकरींची गाडी फोडली. यातून त्यांनी आपला रोष व्यक्त केला. 

हे ही वाचा:

 

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 
Exit mobile version