Sanjay Raut | १०० दिवसांनंतर वाघ पिंजऱ्यातून बाहेर ! | Shivsena | Uddhav Thackeray

Sanjay Raut | १०० दिवसांनंतर वाघ पिंजऱ्यातून बाहेर ! | Shivsena | Uddhav Thackeray

तब्बल १०० दिवसांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांना जामीन मंजूर झाला आहे. राऊतांना जामीन मंजूर होताच, शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यामुळे ईडीला एक मोठा धक्का बसला होता. ईडीनं या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात यावी अशी मागणी कोर्टाकडं केली होती. मात्र, कोर्टाने ही ईडीची मागणी फेटाळली आहे. त्यामुळे संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला. या संपूर्ण प्रकरणामध्ये प्रविण राऊत आणि संजय राऊत या दोघांच्याही जामीन अर्जावर आज निर्णय देण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रावाला चाळ प्रकरणी ३१ जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगातच होते. तब्बल १०० दिवसांनी संजय राऊत हे तुरुंगात होते. त्यांच्या कुटुंबीयांशिवाय त्यांना कुणालाही भेटू दिले जात नव्हते. मध्यंतरीच्या काळात राऊत यांच्या वतीने जामिनासाठी कोर्टात वारंवार अर्जही करण्यात आले. पण त्यांना जामीन मंजूर झाला नव्हता. मात्र, आज अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे शिवसेनेतून आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच सुटका झाल्यानंतर मातोश्रीवर जाण्याची शक्यता हि वर्तवली जात आहे.

या सर्व प्रकरणी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत याना शुभेच्छा दिल्या आहेत तर आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले आहे, “संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच पण बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण गद्दारी केली नाही. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं,” तसेच न्यायदेवतेवर पुर्ण विश्वास होता. न्यायदेवतेचे आभार मानतो. आता मी पुन्हा लढेन. आता मी कामाला पुन्हा मी सुरुवात करेन असा आत्मविश्वास राऊत यांनी जामीन मिळाल्या नंतर व्यक्त केला आहे.

तसेच सोशल मीडियावर देखील संजय राऊत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव हा होत आहे. सत्यमेव जयते…. वाघ परत येतोय … Tiger is back… कोण आला रे कोण आला. अशा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहेत. आता हे प्रकरण पुढे कोणतं वळण घेत हे पाहणे गरजेचं ठरेल

हे ही वाचा : जेलमधून बाहेर पडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ‘आम्ही लढणारे आहोत…

हे ही वाचा :

Sanjay Raut Bail: कोर्टाने EDला झापलं; ईडीने मर्जीने आरोपी निवडले

Exit mobile version