spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

समाज विकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना देण्याची शिवसेनेची मागणी

Thane : ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी समाज विकास विभागाच्यावतीने समाजातील गरजू महिला तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जातात. यंदाही सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी महिला व बालकल्याण समितीच्यावतीने विविध योजनांसाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे, परंतु एकूण उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत.

Thane : ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी समाज विकास विभागाच्यावतीने समाजातील गरजू महिला तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जातात. यंदाही सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी महिला व बालकल्याण समितीच्यावतीने विविध योजनांसाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे, परंतु एकूण उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. जे अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना महाराष्ट्र प्रदेश समन्वयक तथा माजी महापौर नरेश म्हस्के यांचे अध्यक्षतेखाली शिवसेना शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले आहे.

यावेळी शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी संघटक मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, माझी साई समिती सभापती राम रेपाळे माजी सभागृह नेते अशोक वैती, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या.

या योजनातंर्गत दिव्यांग कल्याणकारी योजनांतर्गत शालेय शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्त, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती, उदरनिर्वाहाकरिता, व्यवसायाकरिता, सहाय्यभूत साहित्याकरिता, वैदयकीय उपचाराकरितो, बेरोजगारांना भत्ता, लग्नासाठी अर्थसहाय्य, ६० वर्षावरील दिव्यांगांना अर्थसहाय्य, बचतगट, कुष्ठरुग्णांना अर्थसहाय्य, आरोग्यविम्यासाठी अर्थसहाय्य आदी योजना दिव्यांगांसाठी राबविण्यात येतात. तर महिला व बालकल्याण योजनेतंर्गत विविध १२ योजना तर तृतीयापंथीयांसाठी योजना राबविल्या जात आहेत.

सदर योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करता काही योजनांसाठी उपलब्ध तरतूदीपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले तर काही योजनांमध्ये उपलब्ध तरतूदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे निधीचे योग्य वाटप होणार नाही, कमी अर्ज प्राप्त झालेल्या योजनांचा निधी शिल्लक राहणार व जास्त अर्ज प्राप्त झालेल्या योजनांतील काही अर्जदार यापासून वंचित राहणार आहेत. तरी प्राप्त झालेल्या सर्व अर्जदारांना न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करुन सर्व अर्जदारांना या योजनांचा लाभ देण्यात यावा या मागणीचे निवेदन शिवसेना शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले आहे.

या भेटीदरम्यान ठाणे शहरातील सर्वच प्रभागातील पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावी याबाबत देखील चर्चा करण्यात आली असून त्यालाही आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

हे ही वाचा : 

मोठी बातमी!, भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांचं निधन

१५०० कोटींचे मॅच फिक्सिंग करणारा बुकी अनिल जयसिंगानीया यांच्या अडचणी वाढणारं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss