देवेंद्र फडणवीस यांना काळीज नसेल .. टीका करत सुषमा अंधारे म्हणाल्या

पुण्यात सुरु असणाऱ्या पोटनिवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ भरवण्यात आलेल्या सभेसाठी आघाडीच्या नेत्या सुषमा अंधारे आल्या होत्या.

देवेंद्र फडणवीस यांना काळीज नसेल .. टीका करत सुषमा अंधारे म्हणाल्या

पुण्यात सुरु असणाऱ्या पोटनिवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ भरवण्यात आलेल्या सभेसाठी आघाडीच्या नेत्या सुषमा अंधारे आल्या होत्या. सभेत बोलताना त्यांनी मुखयमंत्री एकनाथ शिंदेची खिल्ली उडवली तसेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे(SUSHMA ANDHARE ) म्हणाल्या देवेंद्र फडणवीसांनी गिरीश बापट यांना बाहेरच्या हवेत श्वास घेताना त्रास होत होता.गिरीश बापट यांच्या नाकात नळ्या होत्या ,त्यांना बाहेरच्या हवेत श्वास घेण्यास त्रास होतो, हे माहीत असतानाही त्यांना प्रचारात उतरवण्याचे काम निर्दयी आणि निष्काळजी माणूसच करू शकतो. देवेंद्र फडणवीस यांना काळीज नसेल .असेच मुक्ता टिळक यांच्याबाबत झाले. जेव्हा विधानपरिषदेच्या निवडणुका झाल्या , तेव्हा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढून मुंबईत मतदानाकरता नेण्यात आले. हे कृत्य करताना देवेंद्र फडणवीसांना जराही माणुसकी वाटली नाही असे वक्तव्य करत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांवर टीका केली आहे.

पुढे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM EKNATH SHINDE) यांच्यावरही हास्यास्पद टीका केली, त्या म्हणाल्या एकनाथ शिंदे यांनी अमित शाह याना आपल्या वडिलांसारखे आहेत असे म्हंटले आहे, पण एकनाथ शिंदे हे ५९ वर्षाचे आहेत तर अमित शाह हे ५८ वर्षाचे आहेत, ५८ वर्षीय वडिलाला ५९ वर्षाचा मुलगा कसा असू शकतो या वक्तव्यावर टीका करत त्या म्हणाल्या माणसाने आपला स्वाभिमान किती गहाण ठेवावा.

चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) हे बाबासाहेब आंबेडकर भीक मागितल्याची भाषा करतात. चंद्रकांत पाटील कोल्हापुरात असताना त्यांना काय मिळाले ? जेव्हा ते कोथरूडमध्ये आले आणि मेधाताई कुलकर्णी यांच्याकडून त्यांचा मतदारसंघ मागून घेतला. यानंतर त्यांनी मेधाताई कुलकर्णी यांना काय भाऊबीज दिली, असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा :

Thackeray VS Shinde,ज्यांच्यावर अपात्रतेची टागंती तलवार आहे, त्यांनाच कशी शपथ दिली जाते… कपिल सिब्बल यांचे माजी राज्यपालांवर बोट

संजय राऊत यांना मिळालेल्या धमकी पत्राचा आम्ही…. एकनाथ शिंदे यांनी दिले आश्वासन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version