spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे-शिंदे गट एकत्र येणार? दीपक केसरकारांच्या सूचक वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

“जी विचारधारा बाळासाहेबांशी जुळत नव्हती त्यापासून उद्धव ठाकरेंना आधी लांब जावं लागेल...

गेल्या ३ ते ४ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या सत्तापालटामुळे अनेक राजकीय घडामोडी घडून गेल्या आहेत. जितेंद्र आव्हाड अटक प्रकरणी तापलेलं राजकीय वातावरण शांत होतंय न होतंय तोवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. दीपक केसरकर यांनी त्यांच्या वक्तव्यातून ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

“जी विचारधारा बाळासाहेबांशी जुळत नव्हती त्यापासून उद्धव ठाकरेंना आधी लांब जावं लागेल, तेव्हा गेलेली माणसं पुन्हा परत यायला वेळ लागणार नाही”, असं सूचक विधान दीपक केसरकर यांनी केलं. “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हिंदुत्वापासून दूर गेले आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकारलं नसतं. बाळासाहेब म्हणायचे गर्व से कहो हम हिंदू है. बाळासाहेबांची ही विचारधारा होती”, असं दीपक केसरकर म्हणाले. “उद्धव ठाकरेंसोबत राहिलेली माणसं ही वैयक्तिक प्रेमापोटी आहेत. त्यांची ती विचारधारा नाही”, असंही दीपक केसरकर यावेळी म्हणाले.

दरम्यान, दिल्ली हायकोर्टात आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. मी गेल्या तीस वर्षांपासून पक्ष सांभाळतोय. त्यामुळे माझ्या वडिलांनी दिलेलं पक्षाचं नाव आणि चिन्ह का वापरु शकत नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी वकिलांमार्फत कोर्टात उपस्थित केला.याबाबत दीपक केसरकरांना प्रश्न विचारला असता त्यांनी पक्ष हा बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केला आणि त्यांच्या विचारांवरच चालणार. त्याला दुसरं उत्तर असू शकतं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हे ही वाचा:

‘राष्ट्रवादी नेत्यांकडे नैतिकता असेल, तर आव्हाडांचा आमदारकीचा राजीनामा स्वीकारला पाहिजे’ ; चंद्रशेखर बावनकुळे

‘महाराष्ट्रात अतिशय गलिच्छ प्रकार सुरू, आव्हाड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी’ ; अजित पवार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss