spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महाराष्ट्र सरकारचा कुणबी-मराठा आरक्षणाचा निघाला जीआर

महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्रे द्यावे. कारण मराठवाड्यातील काही जिल्हे निजाम संस्थेत होते.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरु आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्रे द्यावे. कारण मराठवाड्यातील काही जिल्हे निजाम संस्थेत होते. त्यावेळी शेती करणाऱ्या मराठा समाजाच्या नागरिकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिलं जात होतं. पण नंतर हे संस्थान महाराष्ट्रात विलीन झालं तेव्हापासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीय. त्यामुळे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचं जात प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी मागणी करत मनोज जरांगे यांचं गेल्या दहा दिवसांपासून आंदोलन सुरु आहे.

मनोज जरांगे यांच्या मागणीचा विचार करुन राज्य सरकारने जीआर काढला आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने कालच याबाबत घोषणा केली होती. ज्यांकडे निजामकालीन कुणबी अशा नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर आता राज्य सरकारने याबाबतचा अधिकृत जीआर काढला आहे. सरकारने मनोज जरांगे यांना पत्र पाठवलंय. या पत्रात सरकारने जीआरबाबत माहिती देत उपोषण मागे घेण्याची विनंती केलीय. मराठा समाजातील द्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसूली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्खनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख “कुणबी” असा असेल, तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्यांची काटेकोर तपासणी करुन त्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपणासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. या समितीत महसूल आणि वन विभागाचे अपर मुख्य सचिव, विधि आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारकडून कुणबी-मराठा जात प्रमाणपत्राबाबतचा जीआर काढण्यात आल्यानंतर शिवसेना नेते अर्जुन खोतकर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवली सराटे गावात गेले. तिथे त्यांनी जरांगे पाटील यांना जीआर दाखवला. त्यानंतर खोतकर यांनी मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाला मुंबईत बैठकीचं आमंत्रण दिलं आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळ पाठवू असं सांगितलं. पण मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असं जरांगे यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा: 

ठाणे, पालघर जिल्ह्यातील बुलेट ट्रेन प्रकल्पाचा मार्ग मोकळा…

लग्नाची पत्रिका आली, इथे करणार जश्न -ए- शादी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss