लालबागच्या राजाला मिळाले सिल्व्हर बटण

लवकरच गणपती बाप्पाचे आगमन हे होणार आहे आणि सर्व गणेश मंडळे ही तयारीला सुद्धा लागली आहेत.

लालबागच्या राजाला मिळाले सिल्व्हर बटण

मुंबई – लवकरच गणपती बाप्पाचे आगमन हे होणार आहे आणि सर्व गणेश मंडळे ही तयारीला सुद्धा लागली आहेत. यातीलच एका मंडळाला म्हणजेच सर्वांच्या लाडक्या लालबागच्या राजाच्या मंडळाला यू ट्यूब मार्फत सिल्व्हर प्ले बटण उपलब्ध झाले आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण हे तयार झाले आहे. फक्त मुंबई, महाराष्ट्र नाही तर, जगभरातील गणेश भक्तांना लालबागच्या राज्याचे दर्शन व्हावे म्हणून या गणपती मंडळाने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या याच पुढाकारामुळे समाजमाध्यमांचा वापर प्रभावीपणे करणारे गणेशोत्सव मंडळ ठरले आह. याबद्दल यू ट्यूब इंडिया तर्फे मंडळाला सिल्व्हर बटण प्रदान करण्यात आले आहे.

संपूर्ण जगभर कोरोनाचा संसर्ग पसरल्याने सण, उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे करण्यावर बंदी घाला आली होती. पण याच काळात अनेक मंडळांनी डिजिटल माध्यमांचा आधार घेऊन योग्य प्रकारे त्याच वापर केला आहे. याचाच उपयोग लालबागच्या राजाच्या मंडळाने देखील घेतला आणि राजाचे दर्शन सर्व भक्तांसाठी ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिले. गणेशोत्सव काळात होणाऱ्या सर्व घडामोडी म्हणजेच बाप्पाची आरती, उत्सव काळात होणाऱ्या सर्व घडामोडी, सामाजिक, शैक्षणिक उपक्रम हे सर्व ऑनलाईन स्वरूपात देखील त्यांच्या यू ट्यूब चॅनेल वर उपलब्ध असतात. त्यामुळे भक्तांना घरबसल्या दर्शन हे उपलब्ध होते आणि भक्तांनी देखील याला पंथय प्रमाणात प्रतिसाद दर्शवल्याचे यातून ठळकपणे दिसून येते.

हे ही वाचा :- 

अमृतमोहत्सवानिम्मित देशातील वारसा स्थळांवर १५ ऑगस्टपर्यंत विनामूल्य प्रवेश

 

 

Exit mobile version