संजय राऊत यांची लायकी काय ते संपूर्ण हिंदुस्थानाने पाहिली – प्रवक्ते नरेश म्हस्के

Naresh Mhaske : शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. लायकी नसताना मुख्यमंत्रीपद मिळालं या वक्तव्याचा चांगलाचं समाचार प्रवक्ते नरेश मस्के यांनी घेतला आहे.

संजय राऊत यांची लायकी काय ते संपूर्ण हिंदुस्थानाने पाहिली – प्रवक्ते नरेश म्हस्के

Naresh Mhaske : शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली आहे. लायकी नसताना मुख्यमंत्रीपद मिळालं या वक्तव्याचा चांगलाचं समाचार प्रवक्ते नरेश मस्के यांनी घेतला आहे. संजय राऊत जे म्हणाले ते बरोबर आहे संजय राऊत अनुभवी आहेत, अनुभव अभावी ते बोलणार नाही कदाचित ते यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत असतील. त्यामुळेच त्या अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. कालच मविआचे प्रमुख नेते अजित पवार (Ajit Pawar) काय म्हणाले कोण संजय राऊत? यावरून संजय राऊत यांची पात्रता आणि लायकी सर्वांना समजली आहे. असं म्हणत प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांवर जहरी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी आपली लायकी तपासावी ही महाविकास आघाडी नाही तर महाविकास बिघाडी आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही असं राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी अजित दादा यांचा बाप काढला म्हणत असं म्हणत म्हस्केंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. अजित दादा काल काय म्हणाले काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताखाली मी काम नाराजीने केले यावरून अजित दादा कायम नाराज आहेत हे समजते. जो माणूस विरोधी पक्ष नेता आहे त्याला महाविकास आघाडीमध्ये असे वागवले जाते. असं म्हणत नरेश म्हस्केंनी अजित पवारांच्या वक्तव्याचा तर्क स्पष्ट केला आहे.

दरम्यान नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदर डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या रामनवमी हनुमान जयंती दंगली घडवण्यासाठीच साजरा केली जातेय या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. जितेंद्र आव्हाड हा हिंदू विरोधी माणूस आहे. माझा जाहीरपणे आरोप आहे आव्हाड ज्या पद्धतीने बोलत आहेत तेच दंगली घडून आणतील. मी याबाबत चौकशीची मागणी करतो आहे असे यावेळी शिवसेना प्रवक्ते नरेशन म्हस्के म्हणाले आहेत.

हे ही वाचा : 

मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

समृद्धी महामार्गावर थरकाप उडवणारा आणखी एक अपघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version