Tuesday, July 2, 2024

Latest Posts

टोमॅटोची लाली अन् ग्राहकांचा खिसा खाली !

पूर्वमौसमी पाऊस आणि कडक उन्हामुळे टोमॅटोच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या टोमॅटोसह सर्व भाज्यांचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात भाज्यांचे दर हे ८० ते १०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

जेव्हा स्वयंपाकाच्या जीवनाश्यक वस्तूंचा विचार केला जातो तेव्हा कांदे, बटाटे, टोमॅटो, कोथिंबीर ह्या गोष्टी क्रमाने येतातच.  जेव्हा यापैकी कोणत्याही गोष्टींची गगनाला भिडणाऱ्या किमतीत वाढ होते तेव्हा सर्वसामान्य कुटुंबाच्या महिन्याचे बजेट नक्कीच बदलते. काही दिवसांपूर्वी कांद्याने आपल्याला रडवले होते आणि आता टोमॅटोने आपले तोंड आंबट केले आहे. पूर्वमौसमी पाऊस आणि कडक उन्हामुळे टोमॅटोच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सध्या टोमॅटोसह सर्व भाज्यांचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात भाज्यांचे दर हे ८० ते १०० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.

किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये किलो असलेल्या टोमॅटोच्या दरात टप्प्याटप्प्याने वाढ होताना दिसत आहे. मे महिन्यात टोमॅटो घाऊक बाजारात २० ते २५ रुपये प्रति किलोने विकले जात होते. वाशीतील एपीएमसी (APMC) बाजारात एक आठवड्यापूर्वी १९६१ क्विंटल टोमॅटोची आवक झाली. त्यावेळी घाऊक बाजारात टोमॅटोचे दर ३० ते ४० रुपये प्रति किलो झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु हेच दर आता वाढून सरासरी ८० ते १०० रुपये प्रति किलो होण्याची शक्यता व्यापारानीं दिली आहे. टोमॅटोच्या दरातील वाढ ही केवळ महाराष्ट्रातच नाही तर दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये दिसून आली आहे.

टोमॅटोची आवक कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे दरवाढ झालेली आहे. वाशीतील एपीएमसी बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहे. पावसामुळे उत्पादन खराब होते आणि शेतातून उत्पादन घेण्यास अडचणी येत आहेत या सर्व कारणामुळे बाजारात आवक कमी झाली आहे. महाराष्ट्रातून सातारा, सांगली, सोलापूर, संगमनेर आणि पुणे जिल्ह्यातून टोमॅटो दाखल होतात. मागील वर्षी जुलै महिन्यात टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. किरकोळ बाजारात टोमॅटो १५० ते १७० रुपयांवर तर घाऊक बाजारात १०० ते ११० रुपयांपर्यंत पोहचले होते. ऑगस्ट महिन्यात टोमॅटोचे दर उतरले होते तर आतापर्यंत आवाक्यात होते. आता मात्र, टोमॅटोच्या दराने पुन्हा उसळी मारली आहे. टोमॅटोच्या दराने मारलेल्या उसळीने शेतकऱ्यांचा फायदा होत असला तरी ग्राहकांच्या खिशाला त्याचा फटका बसत आहे. टोमॅटो अजून किती उच्चांक गाठेल या काळजीने सर्व ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.

 

हे ही वाचा:

‘भूमिकन्या-साद घालते निसर्गराजा’ साठी अनुष्काने घेतलं ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण

पावसाळ्यात ‘भुट्टा’ खाताय मग हे नक्की वाचा; ‘असा’ ही होतो फायदा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss