spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पोलिसांविरोधात गावकरी बसले उपोषणाला

छत्रपती संभाजी नगरातील (Chhatrapati Sambhajinagar) ग्रामीण भागात चोरांचे प्रमाण वाढत चालले आहे. तेथील गावकऱ्यांच्या माहितीवरून असे समोर आले की ‘गेल्या काही दिवसांपासून पिसादेवी गावातील वाहने मोठ्या प्रमाणावर चोरीला जात आहेत. गावकऱ्यांनी यासाठी पोलिसांना निवेदन दिले आहे. पोलिसांकडे पोलीस गस्त वाढवण्याची मागणी केली, मात्र पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण करण्याचा मार्ग निवडला. गावकरी व ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषण सुरु केले होते जोपर्यंत पोलिसांकडून ठोस असे आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे गावकऱ्यांनी ठरवले.

त्यानंतर गावातल्या मंडळींनी औरंगाबाद (Aurangabad) ग्रामीण पोलीस अध्यक्ष (police chief) यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, पिसादेवी १५ ते २० हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात कुठल्याही प्रकारची हिंसा होत नाही, गावाने पोलिसांना नेहमी सहकार्य केले आहे. गावात शेतकरी व कामगार लोक राहतात. परंतू गेल्या ८ ते १० महिन्यापासून चोरांनी पिसादेवी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर चोरी केली जात आहे. दर दोन-चार दिवसाने येथे वाहने चोरीला जातात. यामध्ये दुचाकी व चारचाकी अशा गाड्यांचा समावेश आहे. तसेच काही दिवसांपूर्वी दुपारी राधेकृष्ण अपार्टमेन्टमध्ये चोरांनी चोरी करुण सोने व काही रोख रक्कम पळवली. एवढे होत असताना देखील पिसादेवी येथे होणाऱ्या चोरीच्या घटनांचा पोलिस तपास करत नाही.

एवढे होऊन सुध्दा काही दिवसांपासून सुरु असलेल्या घटनांकडे लक्ष दिले तर चोरांना धाक राहीला नसल्याचे पाहायला मिळते, त्यामुळे पिसादेवीचे (PisaDevi )नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे ,मात्र पोलीसांकडून अजूनही काहीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे पोलिसांनी गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता ठोस पाउले उचलले पाहिजे, अशी मागणी निवदेनातून गावकऱ्यांनी पोलिसांना केली आहे.

हे ही वाचा :

एकनाथ शिंदे जे बोलतो तेच करून दाखवतो, एकनाथ शिंदे कसबा निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हणाले

भारतामधील प्रसिद्ध दिगर्शक संजय लीला भन्साळी यांचे काही हिट चित्रपट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss