Vinesh Phogat विनेश फोगाट डिस्क्वॉलिफाय यावर संसदेत पडसाद, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया;

Vinesh Phogat विनेश फोगाट डिस्क्वॉलिफाय यावर संसदेत पडसाद, काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया;

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympic 2024) मध्ये विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अपात्र घोषित केलं आहे. त्यामुळे विनेश फोगाट कुस्तीतून बाद ठरली आहे. विनेश सुवर्ण पदक जिंकणार असल्याची शक्यता असतानाच अचानक ही धक्कादायक बातमी समोर आल्याने सर्वांनाच आश्चर्यकारक धक्का बसला आहे. आता याप्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले आहेत. तर विनेशच्या या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपला जोरदार टोमणा मारला आहे. दिल्लीपासून पॅरिसपर्यंत विनेश फोगाटने चांगलीच हिंमत दाखवल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

विनेश फोगाटने जगातल्या ३ अव्वल दर्जाच्या कुस्तीपटूंना नमवून फायनलमध्ये आपलं स्थान बळकट केलं होतं. त्यामुळेच विनेश आज देशाला सुवर्णपदक मिळवून देणार असल्याची जोरदार चर्चा होती. विनेशच्या या कामगिरीकडे देशाचंच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडाचं लक्ष लागलं होतं. मात्र, विनेशच वजन 100 ग्रॅम जास्त आढळून आल्याने तिला ऑलिम्पिक नियमानुसार अपात्र घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता विनेशला रजत पदक तरी मिळणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

हिंमतीची दाद द्यावीच लागेल विनेश फोगाट डिस्क्वॉलिफाय झाल्यांनतर काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिाय दिली आहे. भारताला गोल्ड मेडल भलेही मिळालं नसेल. परंतु तिने देशाचं मन जिंकलं आहे. तिला जो पुरस्कार मिळाला पाहिजे, तो तिला मिळत नाहीये, याचं मला खूप दु:ख वाटतंय, असं शशी थरूर यांनी म्हटलं आहे.

विनेशने आपलं सर्वांचं मन जिंकलं आहे. पॅरिसच्या आखाड्यात आणि दिल्लीच्या रस्त्यावरती तिने जे काही केलं, त्याचा आपल्या देशाला अभिमान आहे. तिने ज्या पद्धतीने ताकद, हिंमत, आणि आपली पात्रता सिद्ध केली आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. आम्ही तिच्या हिंमतीला दाद दिली पाहिजे. तिला आपण कधीच विसरू शकत नाही. टेक्निकली वजनबाबत नेमकं काय झालं ते मला माहीत नाही. यात कोचचीही जबाबदारी आहे. एवढ्या प्रयत्नानंतरही तिला जो पुरस्कार मिळायला पाहिजे, तो मिळत नाही, याचं मला वाईट वाटतं. अंतिम फेरीपर्यंत पोहोचणं ही अभिमानाची गोष्ट आहे, असं थररू म्हणाले.

संसदेत पडसाद

दरम्यान, विनेश फोगाट स्पर्धेतून बाद ठरल्याने संसदेत त्याचे पडसाद उमटले आहेत. सर्वच खासदारांनी या मुद्द्यावरून संसदेत आरडाओरड सुरु केली. या प्रकणावर क्रीडा मंत्र्यांनी उत्तर देण्याची मागणी केली. यावर क्रीडा मंत्री आज दुपारी 3 वाजता निवेदन सादर करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

Exit mobile version