spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नाशिक मधील काही भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा

राज्यभरात यावर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच शेतीच्या पाण्याचा प्रश्न वाढला आहे.

राज्यभरात यावर्षी खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे सगळीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच शेतीच्या पाण्याचा प्रश्न वाढला आहे. नाशिक जिल्हा हा सुजलाम्-सुफलाम् म्हणून ओळखला जातो. पण यंदा पाऊस पडत असताना नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यातील २१३ गावे आणि वाड्यांना सर्वाधिक ८१ टँकरद्वारे (Water Tanker) पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या सतत पडणाऱ्या पावसामुळे नाशिक जिह्ल्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पण सतत पडणाऱ्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि टँकर बंद होतील अशी आशा होती. पण पाऊस पडला असून देखील टँकरची संख्या कमी होऊ शकली नाही. त्या पावसामुळे स्थानिक पातळी पाणी उपलब्धतेचा प्रश्न सुटलेला नसल्याने जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे. नाशिक जिह्ल्यातील काही भागात पावसामुळे स्थानिक पातळी पाणी उपलब्धतेचा प्रश्न सुटलेला नसल्याने जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र असून टँकरची गरज भासणाऱ्या गावांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे जिह्ल्यात पुरेसा पाऊस झाला नाही तर दुष्काळ पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत सध्या २१३ गावांना ८१ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नाशिक मधील १५ पैकी सात तालुक्यात ट्रँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार जिह्ल्यात १६ आणि १७ सप्टेंबरला येलो अलर्ट देण्यात आला आहे.

राज्यातील कोणत्याच भागात यंदा पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा तर शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे आणि नंदुरबारमध्ये उद्यापासून सलग तीन दिवस मध्यम स्वरुपाचा, तर अहमदनगर जळगावमध्ये येलो जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडल्यास राज्यतील धरण भरण्यास मदत होईल आणि पाणी पातळी वाढेल. या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे.

हे ही वाचा: 

अनंतनागमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई

देशभरातील काही भागात पावसाचा अंदाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss