कोकण पदवीधर मतदार संघ नक्की कोण लढवणार ?

"आम्ही प्रत्येकाने आमची मते किंवा इच्छा आम्ही आमच्या नेत्यांकडे मांडल्या आहेत. त्यामुळे जो काही मुख्य निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. एकूणच महायुतीच्या ताकदीने आम्ही यंदा लढणार आहोत"

कोकण पदवीधर मतदार संघ नक्की कोण लढवणार ?

विधानपरिषदेवरील कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून (Shivsena) आधी संजय मोरे (Sanjay More) उभे होते व यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare)  हे आमने-सामने होते. त्यांच्यात चालू होणाऱ्या रंगतीकडे सर्व देशाचे लक्ष लागून होते. यात एक नवी ट्विस्ट आली ती म्हणजे या दोघांमध्ये शिंदे गटाने आपला उमेदवार माघारी घेतल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना संजय मोरे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता भाजपतसुद्धा(BJP) एकहाती सत्ता बळकावण्याचे संकेत दिसत आहे.“आम्ही प्रत्येकाने आमची मते किंवा इच्छा आम्ही आमच्या नेत्यांकडे मांडल्या आहेत. त्यामुळे जो काही मुख्य निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. एकूणच महायुतीच्या ताकदीने आम्ही यंदा लढणार आहोत” असा विचार मोरे यांनी मांडला. विधान परिषदेवरील कोकण पदवीधर मतदार संघातून शिवसेने तर्फे शिंदे गटाचे संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान याच मतदार संघातून विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी भाजप विधानपरिषद पदवीधर मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे महायुती एकमेकांसमोर उभी राहिली होती.

१२ जुन या शेवटच्या दिवशी संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे मित्र पक्षाला उर्फ महायुतीच्या (Mahayuti) निरंजन डावखरे यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या आधी बिनशर्त पाठींबा देऊन मनसेला (MNS) सुद्धा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अभिजित पानसे (Abhijit Pnsase) हे नाव माघारी घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे जरी ही महायुतीची एक दिलाने लढत असली तरी, भाजप मित्र पक्षाच्या ओंजळीतून पाणी पिताना दिसत आहे. यामुळे लोकांच्या ध्यानात येत आहे की भाजप हा मित्र पक्षाशिवाय काहीच करू शकत नाही.

संजय मोरे यांचा परिचय

संजय मोरे यांना एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हटले जाते. ते कोकण पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. ते शिवसेना पक्षाचे सचिव आहे. त्यांनी ठाण्याचे महापौर पद भूषविलेले आहे. १९९७ ते २०१२ या काळात त्यांना सलग तीन वेळा ठाणे महानगर पालिकेचे नगरसेवक पदसुद्दा मिळाले होते. दरम्यान संजय राऊत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरेगट )कोकण मतदार संघातून माघार घेतली आहे. किशोर जैन त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. परंतु त्यांनी काँग्रेसने नाशिक मतदार संघातून मागे यावे तरच कोकण मतदार संघातून माघार घेण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची अपेक्षा आहे. तर सद्यस्थिती आणि विद्यमान परिस्थितीनुसार आता कोकण पदवीधर मतदार संघात तिरंगी लढत होऊ शकते. काँग्रेस , राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशी लढत होऊ शकेल या तीनच पक्षणांकडून कोकण पदवीधर मतदार संघात काँग्रेस काढून रमेश कीर(Ramesh Kir), राष्ट्रवादी शरद पवार गटातून अमित सरैय्या (Amit Saraiya) यांचे अर्ज आणि भाजपचे निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) कायम राहणार आहेत. विधान परिषेदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ व नाशिक शिक्षक अशा चार मतदार संघावर निवडणूक लागली आहे.

हे ही वाचा

पशुसंवर्धन आयुक्तालयात ‘ही’ आहे नवी भरती

‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ; नवनिर्वाचित खासदार थेट शिवतीर्थावर रवाना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

‘गरज सरो आणि वैद्य मरो’ ; नवनिर्वाचित खासदार थेट शिवतीर्थावर रवाना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version