spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Budget 2023, २०२३-२४ ची अर्थसंकल्पना कोण सादर करणार? वेळ, तारीखसह जाणून घ्या सविस्तर माहिती

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ अगदी जवळ आला आहे. बजेट २०२३ च्या धावपळीत खूप काही घडत असताना वर्षातील सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहता येईल याची उत्सुकता असणे हे स्वाभाविकच आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ अगदी जवळ आला आहे. बजेट २०२३ च्या धावपळीत खूप काही घडत असताना वर्षातील सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहता येईल याची उत्सुकता असणे हे स्वाभाविकच आहे. अर्थसंकल्प फक्त सरकारच्या योजनांवर प्रकाश टाकत नसतो तर त्याचा लोकांच्या जीवनावर कायमस्वरूपी प्रभाव पडत असतो. जो कधी आर्थिक प्रभावाच्या पलीकडे सुद्धा असतो. केंद्रिय अर्थसंकल्प २०२३-२४ बदल काही बारीक सारीक पण मूलभूत तपशिलावर एक नजर तर टाकायलाच हवी. २०२३-२४ चे बजेट कोण सादर करणार? कोणत्या तारखेपासून ते किती वेळापर्यत होणार याबद्दल तुम्हाला महिती असणे आवश्यक आहे.

या वर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२३ रोजी सादर होणार आहे आणि मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही सादरीकरण सहसा सकाळी ११ वाजता सादर होईल. हे सादरीकरण सहसा अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा संसदीय अधिवेशनाच्या अगदी सुरवातीला केले जाते. केंद्रीय अर्थसंकल्प संसदीय अधिवेशन ३१ जानेवारीला होणे अपेक्षित आहे आणि अर्थसंकल्प १ फेब्रुवारी सादर केली जाईल. प्राथमिक सादरीकरण व्यतिरिक्त अर्थसंकल्प अधिवेशन ६ एप्रिल पर्यत सुरु राहण्याची शक्यता आहे. २०१६ पासून अर्थसंकल्पना १ फेब्रुवारीला केला जात आहे.

२०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प कोण सादर करणार आणि कधी सादर करणार असे प्रश्न विचारणाऱ्यांसाठी आधी परिच्छेदात तर कधी सादर होणार याचे तर उत्तर मिळालेच असे आणि आता तुम्हाला कोण सादर करणार याचे उत्तर तुम्ह्ला या परिच्छेदाच्या शीर्षकात उरात आहे. २०२१ प्रमाणेच या वर्षी देखील भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारीला २०२३ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या व्यतिरिक अर्थमंत्री ३१ जानेवारी ला भारताचा आर्थिक सर्वक्षण सादर करणार आहेत.

Latest Posts

Don't Miss