Budget Session of Parliament : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, ‘पक्षासाठी नाही तर देशासाठी लढा’ सर्वपक्षीय खासदारांना नरेंद्र मोदींचे आवाहन

आज या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनेतला संबोधित केले आहे. देशवासीयांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हा एक मजबूत पाया रचणार आहे.

Budget Session of Parliament : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, ‘पक्षासाठी नाही तर देशासाठी लढा’ सर्वपक्षीय खासदारांना नरेंद्र मोदींचे आवाहन

Budget Session of Parliament : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. तर उद्या संसदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन विक्रमी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तत्पूर्वी आज दिनांक २२ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण सादर करणार आहेत. आजपासून सुरू झालेले संसदेचे अधिवेशन १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये एकूण १९ बैठका होणार आहेत. २०२३-२४ चे आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत दुपारी १ वाजता आणि राज्यसभेत दुपारी २ वाजता सादर केले जाईल. दुपारी ०२.३० वाजता महापालिकेत पत्रकार परिषद होणार आहे. आगामी अर्थसंकल्प ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची मे महिन्यात तिसरी टर्म मिळाल्यानंतरची पहिली मोठी धोरणात्मक घोषणा असेल. देशातील बेरोजगारी आणि इतर विद्यमान समस्यांना तोंड देण्यासाठी अर्थसंकल्पात अनेक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या कालावधीत सरकार ६ विधेयके मांडण्याची शक्यता आहे.

आज या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनेतला संबोधित केले आहे. देशवासीयांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हा एक मजबूत पाया रचणार आहे. व्यक्तिशः माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की ६० वर्षांनंतर कोणीतरी सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आले आणि तिसऱ्यांदा पहिला अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान मिळाला. या अधिवेशनावर देशाचे लक्ष लागून आहे. तसेच नरेंद्र मोदी पुढे म्हणाले आहेत की, मी देशातील सर्व खासदारांना सांगू इच्छितो की जानेवारीनंतर आम्ही आमच्यात असलेल्या सर्व क्षमता दाखवल्या आहेत. देशातील जनतेने आपला निर्णय दिला आहे. आता निवडून आलेल्या खासदारांचे कर्तव्य जनतेसाठी, देशासाठी आहे. तर पुढे बोलत असताना नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय खासदारांना पक्षासाठी नाही तर देशासाठी लढा असं म्हणत आवाहन केले आहे. तसेच विरोधकांवर जोरदार हल्लाबोल करताना पीएम मोदी म्हणाले, ‘नवीन संसदेच्या स्थापनेनंतर संसदेचे हे पहिलेच अधिवेशन होते. ज्या सरकारला १४० कोटी देशवासीयांनी बहुमताने सेवा देण्याचा आदेश दिला. त्यांचा आवाज दाबण्याचा अलोकतांत्रिक प्रयत्न झाला. अडीच तास देशाच्या पंतप्रधानांना रोखून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आज सावनचा पहिला सोमवार आहे. या शुभ दिवशी एक महत्त्वाचे अधिवेशन सुरू होत आहे. मी देशवासियांना सावनच्या पहिल्या सोमवारी शुभेच्छा देतो. आज संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. आज संपूर्ण देश याकडे लक्ष देत आहे, हे एक सकारात्मक सत्र असावे.”

हे ही वाचा:

Mumbai उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून ‘इतक्या’ कोटींची तरतूद – Mangal Prabhat Lodha

Balasaheb Thackeray यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे आम्हाला नकली बोलणार?: Sanjay Raut

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version