BUDGET SESSION OF PARLIAMENT : केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर घोषणांचा गोषवारा…

BUDGET SESSION OF PARLIAMENT : केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर घोषणांचा गोषवारा…

लोकसभा निवडणुकीनंतर मोदी ३.० सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष आहे. यंदाचा अर्थसंकल्प ४७ लाख ६५ हजार ७६८ कोटींचा असणार आहे. सलग सातव्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारमन या अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात (Budget 2024) देशातील रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala Sitharaman) यांनी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी तीन नव्या योजनांबाबत संसदेत माहिती दिली. या योजनांच्या माध्यमातून पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. जाणून घेऊयात बजेटमधील महत्त्वाचे मुद्दे

सोबतच काही महत्वपूर्ण घोष्णानची यादी :

  1. मोफत रेशनची व्यवस्था ५ वर्षे सुरू राहील
  2. यावर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद.
  3. रोजगारासाठी सरकार ३ मोठ्या योजनांवर काम करणार आहे.
  4. बिहारमध्ये ३ एक्सप्रेसवेची घोषणा.
  5. बोधगया-वैशाली द्रुतगती मार्ग बांधला जाईल.
  6. पाटणा-पूर्णिया एक्स्प्रेस वेचे बांधकाम.
  7. बक्सरमध्ये गंगा नदीवर दुपदरी पूल.
  8. बिहारमध्ये एक्सप्रेस वेसाठी २६ हजार कोटींची तरतूद.
  9. विद्यार्थ्यांना ७.५ लाख रुपयांचे स्किल मॉडेल कर्ज.
  10. पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पीएफ
  11. नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य

हे ही वाचा:

BUDGET SESSION OF PARLIAMENT : MODI GOVERNMENT चा आज ३ऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प होणार जाहीर..

BUDGET SESSION OF PARLIAMENT : केंद्रसरकासरची इंटर्नशिप योजना नेमकी काय आहे.. ; जाणूयात सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version