spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

BUDGET SESSION OF PARLIAMENT : केंद्रसरकारची इंटर्नशिप योजना नेमकी काय आहे.. ; जाणूयात सविस्तर

लोकसभा निवडणुकीनंतर मोदी ३.० सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी अर्थसंकल्पात कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद केली जाणार आहे. यासह तरुण आणि महिलांच्या उत्थानासाठीही सरकार वेगवेगळ्या योजनांची घोषणा करत आहेत. यंदाचा अर्थसंकल्प ४७ लाख ६५ हजार ७६८ कोटींचा असणार आहे. सलग सातव्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारमन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात (Budget 2024) देशातील रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala Sitharaman) यांनी रोजगार आणि कौशल्य विकासासाठी तीन नव्या योजनांबाबत संसदेत माहिती दिली. या योजनांच्या माध्यमातून पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे.

बजेटमध्ये तरुणांसाठी काय ?

  • खाजगी क्षेत्राच्या सहकार्याने ई-कॉमर्स निर्यात केंद्र तयार केले जाईल आणि तरुणांच्या इंटर्नशिपसाठी सर्वसमावेशक योजना आणली जाईल.
  • ५ वर्षात टॉप ५०० कंपन्यांमध्ये १ कोटी तरुणांना इंटर्नशिप, १०० शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जातील.
  • MSME हमी योजनेअंतर्गत १०० कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध होतील, PSU बँकांनी अंतर्गत मूल्यांकनानंतर MSME ला कर्ज द्यावे.  MUDRA कर्ज मर्यादा १० लाख रुपयांवरून २० लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. MSME ला मदत करण्यासाठी SIDBI शाखा वाढवल्या जाणार आहेत.

मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी :

मोदी सरकारच्या ५ व्या नवीन योजनेअंतर्गत ५०० मोठ्या कंपन्यांमध्ये तरुणांना इंटर्नशिपला संधी मिळणार आहे. सरकारच्या इंटर्नशिप योजनेचा १ कोटी तरुणांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारचं तरुणांना इंटर्नशीपसाठी खास पॅकेज असणार आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना ५०० टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळणार तर आहेच, याशिवाय प्रत्येक महिन्याला ५,००० रुपये इंटर्नशिप भत्ताही दिला जाणार आहे.

इंटर्नशिपनंतर मिळणार ६ हजार रुपये :

कंपन्यांमधील इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या तरुणांना ६००० रुपयांची वेगळी रक्कमही दिली जाणार आहे. या सरकारी योजनेचा ५ वर्षात १ कोटी तरुणांना फायदा होणार आहे.

हे ही वाचा:

BUDGET SESSION OF PARLIAMENT : MODI GOVERNMENT चा आज ३ऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प होणार जाहीर..

SHINDE GOVERNMENT ने घेतला मोठा निर्णय ; मराठा समाजातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss