Rahul Gandhi यांच्या भाषणावर अर्थमंत्री Nirmala Sitaraman यांना आले हसू! भडकलेल्या राहुल गांधींनी केली सडकून टीका

Rahul Gandhi यांच्या भाषणावर अर्थमंत्री Nirmala Sitaraman यांना आले हसू! भडकलेल्या राहुल गांधींनी केली सडकून टीका

विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (सोमवार, २९ जुलै) अर्थसंकल्पावर बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “या अर्थसंकल्पातून शेतकरी, कामगार, महिला, छोटे उद्योजक यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. उलट उद्योगविश्वावर एकाधिकारशाही असलेल्या मोठ्या उद्योजकांच्या फायद्याचे निर्णय घेण्यात आले,” अशा टीका त्यांनी यावेळी केली. याचवेळी, राहुल गांधी यांचे भाषण चालू असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) या कधी हसत होत्या तर कधी डोक्याला हात लावत होत्या. यावरून राहुल गांधींनी त्यांना चांगलेच लक्ष केले.

अर्थसंकल्पात देशातील सर्व प्रवर्गांना प्रतिनिधित्व मिळाले नाही, असा आरोप राहुल गांधींना केला. यावेळी त्यांनी संसदेत एक फोटो दाखवला. अर्थसंकल्प सादर करण्याच्या पूर्वसंध्येला अर्थमंत्रालय परिसरात हलवा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांना आमंत्रित केले जाते. या कार्यक्रमातील फोटो दाखवत राहुल गांधी म्हणाले, “या फोटोत अर्थमंत्रालयाचे काही अधिकारी दिसत आहेत बजेटचा हलवा वाटल्याचे दिसत आहे. या अधिकाऱ्यांमध्ये एकही ओबीसी अधिकारी नाही. एकही दलित अधिकारी नाही. देशात हे काय चाललंय? देशाचा हलवा वाटला जात आहे आणि देशातील ७३ टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधीच नाहीत. सगळा हलवा हेच खात आहेत. २० धिकाऱ्यांनी हलवा तयार केला. म्हणजेच भारताचा हलवा वाटण्याचं काम या २० लोकांनी केलं आहे. या २० पैकी फक्त एक अधिकारी अल्पसंख्यांक तर एक ओबीसी आहे. म्हणूनच अर्थसंकल्पात जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा यावा असे मला वाटते. देशातल्या ९५ टक्के लोकांना जातनिहाय जनगणना हवी आहे.

राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना हसू आले. यावरूनच राहुल गांधी यांनी सीतारामन यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, “अर्थमंत्री हसत आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे हि. हि हसण्याची बाब नाही. मी जातीनिहाय जंगणनेवर बोलत आहे. जातीनिहाय जनगणना केली तर या देशात बदल घडेल, असे ते निर्मला सीतारामन यांना उद्देशून म्हणाले. यावर सीतारामन यांनीही होकारार्थी मान हालवली.

ट्विटरवरूनही राहुल गांधींनी अर्थमंत्र्यांवर केली टीका

यावर राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरूनही भाष्य केले. ते म्हणाले, “आज संसदेत मी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा अर्थमंत्र्यांनी हसून हसून या गंभीर विषयाची खिल्ली उडवली. देशाच्या ९०% लोकसंख्येच्या जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर अशा निष्काळजी प्रतिसादाने भाजपचे हेतू, मानसिकता आणि हेतू उघड झाले आहेत. मला भाजपला सांगायचे आहे की आम्ही कोणत्याही किंमतीत जातनिहाय जनगणना प्रत्यक्षात आणू आणि वंचितांना न्याय मिळवून देऊ. भारत देशाचा एक्स-रे पुढे आणेल.”

हे ही वाचा:

निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा Sharad Pawar करत आहेत : Chandrashekhar Bawankule

साहेब… महाराष्ट्रातल्या बहिणींना आता लाडकी बहिण योजनेपेक्षा ‘सुरक्षित बहिण’ योजनेची गरज, MNS चा CM Shinde यांना टोला

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version