spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Union Budget 2024-25: विरोधक नेहमी टीका करतात त्यांच्या भोंग्याकडे पाहण्यात अर्थ नाही: Chandrashekhar Bawankule

Union Budget 2024-25: लोकसभा निवडणुकीनंतर मोदी ३.० सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आज संसदेत पार पडला आहे. सलग सातव्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitaraman) या अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.. यंदाचा अर्थसंकल्प ४७ लाख ६५ हजार ७६८ कोटी रुपयांचा आहे. या अर्थसंकल्पात (Budget 2024) देशातील रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, एकीकडे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी अर्थसंकल्पाचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे मात्र विरोधकांनी अर्थसंकल्पावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. अश्यातच आता, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी अर्थसंकल्पाबाबत मोठे भाष्य केले आहे.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मोदीं भारताला तिसरी महासत्ता बनविण्यासाठी काम सुरू केलं असू न जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी पहिला अर्थसंकल्प आज आला. महिला, शेतकरी, शेतमजूर, विदर्भ मराठवाडा, मेट्रो ते ग्रामीण रस्ता साठी हा अर्थसंकल्प दिला. या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्राला मजबुती मिळणार. विरोधक नेहमी टीका करतात त्यांच्या भोंग्याकडे पाहण्यात अर्थ नाही. जे आज टीका करत आहे त्यांनी कधीच गरीब कल्याण टॅक्स मध्ये सवलत दिली नाही,” असे ते म्हणाले.

याबाबत बोलताना अतुल सावे म्हणाले, “सर्व घटकांचा समतोल विकास साधणारा अर्थसंकल्प होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी देशातील सर्व घटकांचा समतोल विकास साधणारा अर्थसंकल्प आज सादर केला. शेतकरी, महिला, युवक, तसेच कृषी पायाभूत सुविधा, शहरांचा विकास आदी घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा हा अर्थसंकल्प आहे. शैक्षणिक कर्जावर तीन टक्के व्याज परतावा दिला जाणार असून सात लाख ५० हजार रुपयापर्यंत विनातारण कर्ज दिले जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेद्वारे ३ कोटी घरे बांधली जाणार आहे. शहरातील घरांसाठी १० लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पातून देशासह राज्याला गती मिळणार आहे. याद्वारे पुढील पाच वर्षात २.५ लाख कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे, ” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

Nana Patole: धोरण आणि व्हिजन नसलेला सर्वसामान्यांची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प…

Union Budget 2024-25: बजेटने महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांची दिल्लीतली लायकी कळाली: Rohit Pawar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss