खाते वाटप लवकरच होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | खाते वाटप लवकरच होईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कांजूरमार्ग ची जागा एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. मात्र त्याचा वाद असल्याने तो प्रकरण हायकोर्टात सुरू आहे.मेट्रो कारशेडची जागा मेट्रो थ्री करिता मागितलेली आहे.तर कांजूर मार्ग ची जागा मेट्रो सिक्स साठी मागितली आहे.
कांजूरमार्ग ची जागा मेट्रो थ्री साठी योग्य नाही हे आमच्या काळातल्या कमिटीने तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसीएस सौनिक यांच्या हाय लेवल कमिटी ने ही स्पष्ट अहवाल दिले होते की कार शेड आरे मध्येच योग्य आहे. ते कांजूरमार्ग मध्ये नेलं, तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षाचा उशीर होईल.

मला असं वाटतंय त्यांनी ( उद्धव ठाकरे ) फक्त इगो करिता कांजुर मार्ग धरून ठेवला. मेट्रो कार शेड करिता आरे मध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कार शेडचा 29 टक्के काम पूर्ण झाला आहे.तर एकूण प्रकल्पाचा 85 टक्के काम पूर्ण झाला. त्यामुळे चार वर्ष प्रकल्प थांबवून पंधरा-वीस हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही. हे पैसे जनतेच्या खिशातील पैसे आहे आणि हे अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही.
खाते वाटप लवकरच होईल, काळजी करू नका. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल.तोवर तुम्हाला बरं आहे, तुम्ही दिवसभरात अनेक वेळेला खाते वाटप करत आहात. आम्ही पेपर फोडून टाकलं तर तुम्हाला काम नाही मिळणार.

Exit mobile version