ठाणे – भिवंडी मार्गावरील खड्डे पाहून माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

ठाणे - भिवंडी मार्गावरील खड्डे पाहून माजी मंत्री छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना टोला

काय पाऊस, काय पूर,काय खड्डे, सगळं ओके आहे असे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हंटले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते भिवंडी या महामार्गावर येऊन बघावे सर्व खड्डेच खड्डे पडलेले आहे असे पालकमंत्री छगन भुजबळ हे लासलगाव येथे  निफाड तालुक्यातील सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री राहिले असून त्यांच्याकडे सध्या सर्वच खाती आहे.त्यामुळे त्यांनी ठाणे ते भिवंडी या मार्गावर येऊन प्रवास करावा या ठिकाणी खड्डेच खड्डे पडले असून काय पाऊस, काय पूर, काय खड्डे असे म्हणत छगन भुजबळांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते भिवंडी मार्गावरून प्रवास करून दाखवावा असे आव्हान केले आहे. सरपंच जनतेतून पाहिजे मग मुख्यमंत्री फुटलेल्या आमदारातून का असा सवाल करत सरपंच देखील निवडून आलेल्या सदस्य यातून निवडून द्या असे म्हणत हे सरकार अजून ही मंत्रिमंडळ बनवत का नाही.

Exit mobile version