जॅकलिन फर्नांडिस वर खंडणी प्रकरणी आरोपपत्र दाखल

Jacqueline Fernandez वर खंडणी प्रकरणी आरोपपत्र दाखल

जॅकलीन एका कार्यक्रमासाठी दुबईला जात असताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी 5 तारखेला मुंबई विमानतळावर तिला थांबवले होते. सुकेश चंद्रशेखर यांच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सुकेश या उद्योगपतीने एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. या ५ जनावरांमध्ये अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेल्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश आहे. जॅकलिन फर्नांडिसचे आणि सुकेशचे अनेक कनेक्शन समोर आले आहेत. त्यामुळे ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ईडीने यापूर्वीही २१५ कोटी रुपयांचा खंडणीचा आरोप केला होता. त्यानंतर आज ईडी तिच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे. जॅकलिनसोबतच या आरोपपत्रात अभिनेत्री नोरा फतेहीचाही उल्लेख केला आहे.

Exit mobile version