सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे CM Eknath Shinde यांनी घेतले दर्शन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे CM Eknath Shinde यांनी घेतले दर्शन

कोकणवासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दर्शन घेतले आहे. यावेळी बोलताना, कोकणी माणूस हा जगात कुठेही असला तरीही दरवर्षी न चुकता अंगणेवाडीच्या जत्रेला आवर्जून उपस्थित असतो. आज माझे सौभाग्य की मला आई भरडीदेवीचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून त्यासाठी एमएमआरडीएच्या धर्तीवर ‘कोकण विकास प्राधिकरण’ स्थापन केले असून या माध्यमातून या भागातील अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील. तसेच कोकणातील नद्यातून वाहून जाणारे पाणी बंधारे बांधून अडवण्याची गरज आहे.

कोकणात लोकसभेसाठी Narayan Rane की Uday Samant? सेनेला मात देण्यासाठी भाजपची रणनिती! | Kokan

Exclusive: आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून ही राणेंची सवय, भास्कर जाधवांची टीका

Exit mobile version