spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

उन्हाळ्यामध्ये सब्जाचे सेवन फायदेकारक | Basil Seeds | Summer Season

ऊष्ण व दमट वातावरणामध्ये उष्णतेचे विकार बळावणे, हे निसर्गाच्या नियमाला धरुनच म्हटले पाहिजे.

ऊष्ण व दमट वातावरणामध्ये उष्णतेचे विकार बळावणे, हे निसर्गाच्या नियमाला धरुनच म्हटले पाहिजे. त्यातही ज्यांना उन्हाचा प्रत्यक्ष सामना करावा लागतो अशा मंडळींना, ज्यांना ऊन बाधते, अशा पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना आणि कडक उन्हाळा असूनही उष्ण गुणांचा आहार घेणार्‍यांना उन्हाळा फार बाधतो. त्यामुळे विविध उष्णताजन्य तक्रारी या दिवसांमध्ये त्रस्त करतात. जसे- मूत्रविसर्जन वा मलविसर्जन करताना दाह वा वेदना होणेअंगावर पित्त उठणे, तोंड येणे, त्वचेवर उष्णतेच्या पिटीका येणे, नाकातून वा गुदावाटे रक्त पडणे वगैरे. या सर्व तक्रारींना प्रतिबंध म्हणून आणि तक्रारी फार गंभीर नसताना घरच्याघरी करण्याजोगा सुरक्षित उपचार म्हणजे ’सब्जा’.सब्जा हे तुळशीसारखेच एक लहानसे क्षुप असते, जे सर्वत्र उगवते. त्यातही पंजाब राज्यामध्ये सब्जाची रोपटी अधिक पाहायला मिळतात. या सब्जाच्या झाडाचे बी हे तुळशीच्या बीपेक्षा किंचित मोठ्या आकाराचे व काळसर-करड्या रंगाचे असते. हे बी पाण्यामध्ये भिजवल्यावर ते फुगते व पाणी शोषून पांढरट रंगाचे व बुळबुळीत बनते. भिजून फुगल्यानंतर हे बी पाण्यामधून, दुधातून वा सरबतातून घेतल्यास ते उष्णताजन्य वरील विकारांवर अतिशय गुणकारी ठरते.

हे ही वाचा : 

IPL2023, चेन्नई आणि गुजरातची ताकत वाढणार, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू भारतात दाखल राहुल गांधींना जमीन मंजूर, पुढील सुनावणी ३ मे रोजी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss