spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विवाहस्थळी पोहचण्यासाठी नवरदेवाने लढवली अनोखी शक्कल.

उमरखेड तालुक्यातील संगम चिंचोली येथे नियोजित विवाहासाठी हदगावच्या करोडी येथील वर शाहजी राकडे हा जलमार्गाने धोकादायक प्रवास करीत वऱ्हाडयांसह विवाहस्थळी पोहोचला. करोडी ते चिंचोली संगमला पोहोचण्यासाठी असलेला रस्तेमार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद आहे. त्यामुळे विवाहासाठी मुहूर्तावर पोहचण्याकरिता वर मंडळींनी हा धोकादायक मार्ग स्वीकारला. पुराच्या पाण्यात थर्माकोलच्या हुडीवर स्वार होऊन वर मंडळी पैनगंगा व कयाधु नदीच्या संगमावरील चिंचोली संगम येथे रात्रीच टिळा हळदीच्या कार्यक्रमासाठी पोहोचले.

Latest Posts

Don't Miss