spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिर्डीमध्ये गुरुपौर्णीमा उत्सव विविध कार्यक्रमांसहित संपन्न

श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या सांगता दिनी समाधी मंदिरात संस्थानच्‍या विश्‍वस्‍त श्रीमती मिना शेखर कांबळी यांनी सहपरिवार श्रींची पाद्यपूजा केली. यावेळी विश्‍वस्‍त अॅड.सुहास आहेर उपस्थित होते.श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या सांगता दिनी गुरूस्थान मंदिरात संस्थानचे विश्‍वस्‍त अॅड.सुहास आहेर व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.स्मिता आहेर यांनी रुद्राभिषेक पूजा केली. यावेळी विश्‍वस्‍त सचिन गुजर व श्रीमती मिना कांबळी उपस्थित होते. श्री गुरुपौर्णीमा उत्सवाच्या सांगता दिनी काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात दहिहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, सुरेश वाबळे, जयंतराव जाधव, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, सुनिल शेळके, सचिन कोते, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss