जाणून घ्या… दक्षिण भारतातील ओनम सणांबद्दल

जाणून घ्या... दक्षिण भारतातील ओनम सणांबद्दल । Onam festival

भारताचा दक्षिण भाग हा कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू आणि केरळमध्ये विभागला गेला आहे. येथील निसर्ग जेवढी विविधता दाखवतो तेवढीच प्रत्येक राज्यातील परंपरा देखील भिन्न असतात. आज दक्षिण भारतात ओनम हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. या दिवशी बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर परत येतो अशी एक आख्यायिका सांगितली जाते. ओनम हा मल्याळी बांधवांचा मोठा सण आहे. हा सण जगभरातील मल्याळम बांधवांकडून धुमधडाक्यात साजरा केला जातो. ओनम म्हणजे केरळच्या नवीन वर्षाची सुरुवात असते. मागील तीन वर्षानंतर पहिल्यांदाच हा सण निर्बंधमुक्त साजरा होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सहाचे वातावरण आहे. बळी राजाच्या समृद्ध आणि सामर्थ्यशाली राजवटीचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ‘ओनम’. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात जिथे-जिथे मल्याळी नागरिक आहेत तिथे, जाती धर्माच्या भिंती दूर सारत ओनम उत्साहात साजरा करतात.

Exit mobile version