हे सरकार बेकायदेशीर घटना बाह्य – संजय राऊत

हे सरकार बेकायदेशीर घटना बाह्य - संजय राऊत

ठाकरे सरकारने औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, नवी मुंबई विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव दिलंय, हे निर्णय रद्द केले हे खरं असेल तर हे सरकार हिंदूत्व द्रोही, महाराष्ट्र द्रोही आहे हे सिद्ध झालंय
– औरंगाबादचं संभाजीनगर कधी करता यासाठी भाजप विचारत होते
– उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्ववादी भुमिकेतून हे निर्णय घेतले होते, या निर्णयाला स्थगिती दिली असोत ते यांच्यासारखे ढोंगी लोक नाही
– मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांना निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही
– हे निर्णय बदलून काय साध्य केलं हे फडणवीस यांना विचारायला हवं, मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीही नाही
– एकाबाजूला तुम्ही शिवसेनेनं हिंदूत्त्व सोडलं असा आक्रोश करता, तर दुसऱ्या बाजूनला हे निर्णय बदलला
– आरे विषया वर आम्ही संघर्ष करु
– औरंगजेब आता तुमचा कसा काय नातेवाईक झालाय?
– हा उस्मान कोण लागतोय तुमचा?
– हे सरकार गोंधळलेय, या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे, त्यामुळे त्यांचा मेंदू बधीर झालाय
– वेळा जुळल्या तर शरद पवार यांची भेट घेईल
– आता बैठकीला जातोय, त्यानंतर रामटेक भागात जाणार
– मी शिवसेनेचा माल आहे का? ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. शिवसेनेसोबत निष्ठेनं राहणे म्हणजे शिवसेना संपवणे नाही
– संसदेत नियम आणलाय की काही शब्द वापरायचे नाही, स्वाताचे डाग पुसण्यासाठी हे केलंय
– ही शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार
– सेना संपवणारे भाजपसोबत गेलेय.
– संसदेत यापुढे काहीहीच करता येणार नाही, हात पाय बांधून तोंडावर चिकट पट्ट्या बांधून आम्हाला जावं लागणार आहे. यादेशात आणिबाणी पेक्षा जास्त भयानक स्थिती आहे
– आणिबाणी सहभागी असलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय कशाला घेतलाय. आम्ही आणिबाणी विरोधात लढतोय. त्यामुळे सर्व महाराष्ट्राला पेन्शन द्यावी लागेल
– चिठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट खेचतात बऱ्याच गंमती जमती राज्यात पहायला मिळतेय. यावर मी काय बोलणार. खरे मुख्यमंत्री काय बोलणार
– आशिष देशमुख यांची स्वतंत्र विदर्भाची जुनी भुमिका आहे, पण काँग्रेस आमच्यासोबत आहे
– वेळ जात नसेल तर राज्यपाल लाटा मोजतात काय. राज्यात घचनाबाह्य काम करत आहे, आमच्या सरकारमध्ये त्यांचे लक्ष असायचे. मग आता राज्यपालांची घटना समुद्रात बुडवली का

Exit mobile version