मनसेची नवी भुमिका ‘हलाल विरोधात’

मनसेची नवी भुमिका 'हलाल विरोधात' । New Role of MNS 'Against Halal'

हलाल म्हणजे ते जेवण जे कुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे इस्लामिक कायद्याचे पालन करते. यामध्ये जनावरे किंवा कोंबड्या अशा प्राण्यांचा देवासाठी बळी दिला जातो. मात्र हा बळी देताना त्याची थेट हत्या न करता प्राण्यांच्या मानेची विशिष्ट धमनी कापली जाते. आता या हलाल पद्धतीला राजकीय स्वरूप मिळाले आहे. म्हणजेच हलालची मक्तेदारी तोडून काढावी आणि वाल्मिकी समाजाला रोजीरोटी मिळवून द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. तसेच मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यान एक पत्रक जरी केले आहे . त्या जरी केलेल्या पत्रकात त्यांनी देशातील सर्वात मोठ्या दहशतवादी निधी आणि जागतिक स्तरावर 7 ट्रिलियन अर्थव्यवस्था हलाल विरुद्ध लढण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. हलाल पद्धतीने मिळवलेला हा सर्व पैसा दहशतवाद्यांना दिला जात असून त्यावर बंदी घातली पाहिजे अशी मागणी मनसेनं केली आहे. त्यामुळे मनसे ‘नो टू हलाल’ ही मोहीम हाती घेणार आहे.

Exit mobile version