नागपुरातील खासदार महोत्सवादरम्यान नागपुरातील फुटाळा तालाबातील कारंजे 16 ते 18 तारखेपर्यंत नागपुरातील जनतेसाठी सुरू करण्यात आले.
ह्या औचित्य साधून आज राज ठाकरे हे कारंजे बघायला गेले या ठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागता साठी स्वतः केंद्रीयमंत्री नितीन गडकरी पहुचले.नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांनी बसून दोघांनी एकत्र हा फाउंटेन शो पाहिला.फाऊंटन शो पाहून राज ठाकरेंनी गडकरींचे कौतुक केले. आणि म्हणाले की, गडकरी जे काही करतात ते हवेतच करतात, पूर्वी ते उड्डाण पूल बनवायचे, आज त्यांनी हा कारंजा भारतात आणला आहे. असे शो आपण फक्त भारताबाहेर पाहिले असल्याचेही राज ठाकरेंनी मान्य केले. असा शो भारतात पहिल्यांदाच पाहिला.
राज ठाकरे नुकतेच फाउंटन शो पाहण्यासाठी आले होते की नितीन गडकरींसोबत महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा करण्यासाठी, हे येणारा काळच सांगेल