आज शिक्षकदिन जाणून घेऊया… डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल

आज शिक्षकदिन जाणून घेऊया… Dr. Sarvapalli Radhakrishnan यांच्याबद्दल

आज ५ सप्टेंबर, शिक्षक दिन! (Teachers Day) देशातील शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या कार्याची दखल घेऊन आज त्यांचा गौरव केला जातो. खरं तर शिक्षक दिन म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती. भारताच्या दक्षिण टोकाला तामिळनाडू राज्यात चित्तूर प्रांतात, तिरुत्ताणी या छोट्याशा गावात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ मध्ये एका मध्यमवर्गीय धार्मिक तेलगू कुटुंबात झाला. त्यांचे वडील साधे तहसीलदार होते. ५ सप्टेंबर १८८८ रोजी जन्मलेले डॉ. राधाकृष्णन (Dr. Radhakrishnan) हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. डॉ. राधाकृष्णन हे शिक्षक, तत्त्वज्ञ आणि विद्वान म्हणून उल्लेखनीय कार्यासाठी ओळखले जातात.

Exit mobile version