बिग बी-रश्मिकाच्या ‘गुडबाय’चा ट्रेलर प्रदर्शित

बिग बी-रश्मिकाच्या ‘गुडबाय’चा ट्रेलर प्रदर्शित । The trailer of Goodbye released

अमिताभ यांचा ‘गुडबाय’ हा चित्रपट पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह नीना गुप्ता, रश्मिका मंदाना असे कलाकार दिसणार आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री ‘रश्मिका मंदाना’ या चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजेच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काल ‘गुडबाय’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरवरुन हा चित्रपट एका कुटुंबावर आधारलेला असल्याचे लक्षात येतं. नातेसंबंधाच्या गुंत्यात अडकलेल्या या कुटुंबातील एका व्यक्तीचे निधन होते. निधनामुळे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र येते. म्हणजेच आईच्या (नीना गुप्ता) अंत्यसंस्कारावरून त्यांच्यामध्ये भांडण सुरू असतं. वडिलांना (अमिताभ बच्चन) संपूर्ण विधीवत अंत्यसंस्कार करायचे असतात. मात्र त्यांची मुलगी (रश्मिका) त्या सर्व गोष्टींवर प्रश्न उपस्थित करते. अंत्यविधीतील छोट्या-छोट्या गोष्टी तिला मान्य नसतात. तिची भावंडंसुद्धा अशीच असतात. एक दुबईत अडकलेला असतो, तर दुसरा आईच्या निधनानंतर केशवपन करण्यास नकार देतो. हे सर्व पाहून बिग बी नाराज होतात. म्हणजेच एकंदरीत पहिले तर फॅमिली ड्रामा असलेला हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Exit mobile version