Vikroli त गणेशोत्सवातून मोबाईल व्यसनमुक्तीचे आवाहन | Ganeshotsav 2024 |

Vikroli त गणेशोत्सवातून मोबाईल व्यसनमुक्तीचे आवाहन | Ganeshotsav 2024 |

मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मानवी जीवन बदलले आहे. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये माणूस इतका मग्न होतो की आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, याचे भान राहत नाही. म्हणूनच मोबाईलचा अतिरेक टाळण्यासाठी घरगुती गणेशोत्सवाच्या सजावटीतून विक्रोळीतील दर्शना गोवेकर- गायकवाड यांनी संदेशात्मक देखावा साकारला आहे. मोबाईलच्या अति वापरापासून लोकांची सुटका होऊ दे, सामाजिक भान असलेला समाज घडू दे, असे साकडे गणरायाला घालण्यात आले आहे. देखावा तयार करण्यासाठी त्यांना पंधरा दिवसांचा कालावधी लागला. की पॅड चे मोबाईल असताना आणि स्मार्टफोन आल्यानंतर बदललेले मानवी जीवन यावर संदेश आणि देखावा साकारण्यात आला. सजावटीसाठी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर केला आहे. स्मार्टफोनमध्ये आपण कसे गुरफटून गेलो आहोत हे या सजावटीतून दाखवण्यात आले आहे.

PM Narendra Modi यांनी घृणास्पद राजकीय षडयंत्र रचले आणि… Manish Sisodiya यांची जहरी टीका

धुळे जिल्ह्यात गणपती विसर्जनाला गालबोट! ट्रॅक्टरखाली तीन बालकांचा मृत्यू, तर ६ जण जखमी

Exit mobile version